
किरकोळ भांडणातून मुलाकडून झालेल्या मारहाणीमध्ये वडिलांना दुखापत झाली यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला, मारहाणीची घटना वेल्हे तालुक्यातील खोपडेवाडी गावात घडली आहे. रमेश विठ्ठल जोरकर (वय, ५५) असे मयत झालेल्या व्यक्ती चे नाव असून या प्रकरणी मुलगा प्रकाश रमेश जोरकर (वय-२९) यास वेल्हे पोलीसांनी अटक केली. याबाबत मयत व्यक्तीची पत्नी संगीता जोरकर यांनी पोलिसात फिर्याद दिली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.
वेल्हे, (पुणे) - किरकोळ भांडणातून मुलाकडून झालेल्या मारहाणीमध्ये वडिलांना दुखापत झाली यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला, मारहाणीची घटना वेल्हे तालुक्यातील खोपडेवाडी गावात घडली आहे. रमेश विठ्ठल जोरकर (वय, ५५) असे मयत झालेल्या व्यक्ती चे नाव असून या प्रकरणी मुलगा प्रकाश रमेश जोरकर (वय - २९) यास वेल्हे पोलीसांनी अटक केली. याबाबत मयत व्यक्तीची पत्नी संगीता जोरकर यांनी पोलिसात फिर्याद दिली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ च्या दरम्यान आरोपी प्रकाश जोरकर हा त्याच्या मित्रांसोबत त्याच्या राहत्या घरी खोपडेवाडी येथे आला असता जेवणाची ताटे घरा बाहेर घेऊन येण्याची मागणी त्याची पत्नी शकुंतला हिला सांगितले परंतु वडिलांनी तो कोण काय जहागीरदार आहे का, येईल आत मध्ये असे म्हणण्यावरून वाद झाल्याने रमेश विठ्ठल जोरकर यास सख्ख्या मुलाने बापाला लाथाबुक्क्यांनी बेदम केली.
आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी
आरोपी ची सावत्र आई संगीता जोरकर व पत्नी शकुंतला ही भांडणे सोडवण्यास आल्या असता त्यांना न जुमानता वडिलांना काठीने,लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली या बेदम मारहाणीत त्यांना दुखापत झाली यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार चालू होते उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात आज (ता.२९) रोजी दुपारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.
Edited By - Prashant Patil