

Emotional Scenes as Father’s Kidney Saves Son in Pune
sakal
पुणे : सोलापुरात शिवणकाम करणारे वडील आणि पुण्यात सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करणारा ३३ वर्षीय मुलगा, असं साधं, कष्टाळू कुटुंब. मात्र, दीड वर्षापूर्वी झालेल्या उच्च रक्तदाबामुळे मुलाची दोन्ही मूत्रपिंडे (किडन्या) निकामी झाली. वडिलांनी पुण्यातील खासगी रुग्णालयांचे उंबरे झिजवले; त्यांना १० ते ११ लाखांचा खर्च सांगितल्याने कुटुंब हतबल झाले. ससून रुग्णालयाने नाममात्र खर्चात मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. वडिलांनी मूत्रपिंड दान केल्याने मुलाला नवजीवन मिळाले अन् कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा नवा किरण उजाडला.