
पुणे : कौटुंबिक वादातून कुऱ्हाड डोक्यात घालून मुलाचा खून करणाऱ्या वडिलांना न्यायालयाने जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी हा निकाल दिला. दशरथ चिमाजी जमदाडे (वय ६५, रा. माळवाडी वीर, ता. पुरंदर) असे वडिलांचे नाव आहे.