भांडणात आईची बाजू घेते म्हणून, बापाने मुलीच्या डोक्यात मारला तवा 

टीम ई-सकाळ
बुधवार, 29 जानेवारी 2020

आरोपी हा दारुचा व्यसनी असून, सहा महिन्यांपूर्वी रात्री झोपेत असलेल्या स्वतःच्या मुलीसोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते.

तळेगाव स्टेशन (पुणे) : मागील भांडणाचा राग काढून, भांडणात आईची बाजू घेते म्हणून, स्वतःच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या डोक्यात तवा मारल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी आरोपी बापाला अटक करण्यात आलीय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडले? 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आरोपी हा दारुचा व्यसनी असून, सहा महिन्यांपूर्वी रात्री झोपेत असलेल्या स्वतःच्या मुलीसोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते. यावरून त्याचे आणि पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. 25 जानेवारीला दोघा नवरा बायकोमध्ये भांडण झाले. त्या वेळी पीडित मुलगी आईची बाजू घेऊन बोलत होती. याचा राग त्या बापाने मनात ठेवला होता. दुसऱ्या दिवशी (२६ जानेवारी) सायंकाळी मुलगी जेवण करत असताना आरोपी बापाने तवा उचलून अल्पवयीन मुलीच्या डोक्यात मारला. जखमी मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आरोपीला अटक
या प्रकरणी मुलीची आई वंदना अनिल राजपूत (३८, इंद्रायणी कॉलनी, प्लॉट नं १२, सप्तश्रृंगी मंदिर जवळ तळगाव दाभाडे, ता. मावळ) हिने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मुलीचा बाप अनिल राजपूत याच्या विरुद्ध बाललैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father hits 17 year old daughter by frying pan talegaon pune