कात्रज : अल्पवयीन मुलाकडून वडिलांचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खून

कात्रज : अल्पवयीन मुलाकडून वडिलांचा खून

पुणे : खेळावरून बहिण-भावात झालेल्या भांडणामध्ये वडिलांनी मुलाला मारले. त्यामुळे चिडलेल्या अल्पवयीन मुलाने वडिलांना चाकूने मारुन, त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी कात्रजजवळील जांभूळवाडी परिसरात घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. (Father murder by a minor Son in Katraj)

वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेली व्यक्ती ही सुरक्षारक्षक म्हणून काम करते. इमारतीचे काम सुरू असल्याने मागील दोन ते तीन वर्षांपासून ते संबंधित इमारतीमध्येच काम करून, तेथेच राहतात. त्यांना चार मुले आहेत.

हेही वाचा: सिंहगडावर अतिक्रमण कारवाईचे संकेत; वन विभागाने कसली कंबर

गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ते घरामध्ये कांदा चिरत होते. त्यावेळी घरासमोरील पार्किंगमध्ये खेळणारा त्यांचा १३ वर्षांचा मुलगा व लहान मुलीची खेळण्यावरुनच भांडणे झाली. तेव्हा वडिलांनी बाहेर जाऊन, मुलाला हाताने मारत घरामध्ये आणले. त्यावेळी वडिलांनी आपल्याला मारहाण केली, याचा राग आल्याने मुलाने तेथील चाकू घेऊन, वडिलांच्या छातीत मारला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: उजनीच्या पाण्यासाठी कळसला रास्ता रोको

loading image
go to top