पुणे : बलात्कारप्रकरणी नराधम बापास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Court
पुणे : बलात्कारप्रकरणी नराधम बापास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

पुणे : बलात्कारप्रकरणी नराधम बापास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

पुणे - पोटच्या अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) वारंवार बलात्कार (Rape) करणाऱ्या बापास न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप शिक्षा (Life Imprisonment) व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा (Punishment) सुनावली आहे. विशेष न्यायाधीश (पोक्सो) के. के. जहागीरदार यांनी हा निकाल दिला.

शिक्षा सुनावलेला ४३ वर्षीय गुन्हेगार मुळचा उत्तरप्रदेश येथील रहिवासी असून तो येथील एका बांधकाम साइटवर सुपरवायझर म्हणून काम करत होता. पत्नीचे निधन झाल्यावर आरोपी त्याच्या दोन्ही मुलांना घेऊन पुण्यात राहण्यासाठी आला होता.

हेही वाचा: बारावीच्या वेळापत्रकात बदल 'अर्धमागधी’ विषयाची परीक्षा आता ८ मार्चला

या बाबत गुन्हा दाखल होण्याच्या तीन वर्षे आधीपासून आरोपीने १३ वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केला होता. बाप करीत असलेला प्रकार असह्य झाल्यावर मुलगी स्वतः पोलिस ठाण्यात गेली होती. त्यावेळी रडत असलेल्या मुलीला पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या महिलेला बोलावून धीर दिला व तिच्याकडून माहिती घेतली. वडील माझ्यावर वारंवार बलात्कार करीत आहे. याबाबत कोणाला माहिती दिली तर भावाला मारून टाकीन, अशी धमकी देत आहे. त्यांनी भावासमोर सुद्धा हे कृत्य केल्याचे मुलीने सांगितले. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर खटल्यात विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी एकूण नऊ साक्षीदार तपासले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी फिर्यादी, मुलगी, डॉक्टर आणि तपासी अंमलदार यांची साक्ष महत्त्वाच्या ठरली. डॉक्टरांच्या साक्षीवरून मुलीवर वारंवार बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. मुलीस मनोधैर्य योजनेंतर्गत नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक अश्विनी पाटील यांनी केला. खटल्यात पोलिसनाईक विशाल मदने व पोलिस हवालदार सचिन शिंदे यांनी सरकार पक्षाला मदत केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top