पुणे :...म्हणून येवले चहावर एफडीएची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

येवले चहासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडर, मसाला, साखरेच्य नमून्यांची प्रयोगशाळेकडून तपासणी करण्यात आलेली नाही. तसेच त्यांच्याकडे माल विक्रीचा परवाना नसल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) येवले चहाला दणका देत सहा लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. 

पुणे : येवले चहासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडर, मसाला, साखरेच्य नमून्यांची प्रयोगशाळेकडून तपासणी करण्यात आलेली नाही. तसेच त्यांच्याकडे माल विक्रीचा परवाना नसल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) येवले चहाला दणका देत सहा लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. 

कोंढव्यातील वेळेकर नगर येथे येवले चहाच्या फुड प्रोडक्‍टचे गोडावूनवर ही करावाई करण्यात आली. येवले चहा पिल्याने आजार होतात अशी माहिती "एफडीए'ला मिळाली. त्यानुसार "एफडीए'च्या अधिकाऱ्यांनी गोडावूनमध्ये जाऊन पाहणी केली. तेथे येवले चहाच्या प्रमिक्‍स उत्पादनांची तपासणी केली असता तेथे लेबल नसलेली व कोणत्या पदार्थात कोणत्या घटकाचे किती प्रमाण आहे हे नमूद नसलेले पॅकबंद चहा पावडर, चहा मसाला, साखर आढळली. या विक्रीसाठी ठेवलेल्या उत्पादनांची प्रयोगशाळेकडून तपासणी आवश्‍यक होती, पण ते देखील करण्यात आलेली नाही. तसेच त्यांच्याकडे हे पदार्थ विक्रीचा परवाना नसल्याचे या पाहणीमध्ये अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यावरून "एफडीए'ने सहा लाख रुपयांचा माल जप्त केला. 

येवले चहा पिल्याने पित्त होत नाही, चहासाठी फक्त मिनरल वॉटर वापरले जाते असे दावे केले होते. त्यातही तथ्य आढळून आले नसल्याने ही जाहिरात दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे नोटीस बाजवण्यात आली आहे, अशी माहिती "एफडीए'चे सहाय्यक आयुक्त सु. स. देशमुख यांनी दिली. 

पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये भूकंपाचे धक्के; 19 जणांचा मृत्यू, 300 जखमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FDA action against Yewale Tea in Pune