पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये भूकंपाचे धक्के; 19 जणांचा मृत्यू, 300 जखमी

पीटीआय
Tuesday, 24 September 2019

पाकव्याप्त काश्‍मीरला आज भूकंपाचा जोरदार धक्का बसून, त्यात किमान 19 जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीनशेहून अधिक जण जखमी झाले आहेत.

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्‍मीरला आज भूकंपाचा जोरदार धक्का बसून, त्यात किमान 19 जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीनशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. रिश्‍टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी होती, तर केंद्रबिंदू पंजाब प्रांतातील झेलम या शहरात होता, असे पाकिस्तानच्या वेधशाळेने म्हटले आहे. 

या भूकंपाचे हादरे पाकिस्तानात लाहोर, रावळपिंडी, पेशावर, अबोटाबाद, तर भारतात हरियाना, पंजाब, जम्मू-काश्‍मीर आणि दिल्ली परिसरात जाणवले. भूकंपामुळे पाकव्याप्त काश्‍मीरमधील मीरपूर येथे घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड होऊन त्यात 19 जणांचा मृत्यू झाल्याचे येथील पोलिसांनी सांगितले.

मद्यपान करताय? पण 8 दिवस थांबा! आहे 'ड्राय डे'

अनेक रस्त्यांनाही भेगा पडल्या. आज संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवू लागताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि त्यांनी घराबाहेर पडत रस्त्यांवर धाव घेतली. पाकव्याप्त काश्‍मीर व्यतिरिक्त इतर ठिकाणी या भूकंपामुळे हानी झाल्याचे वृत्त नाही. 

अजित पवारांसह 'ईडी'कडून 71 जणांवर गुन्हा दाखल

या भूकंपानंतर पाकिस्तानी सैन्याला बचाव मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले असल्याचे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांनी सांगितले. भूकंपामुळे मीरपूरजवळील वीजकेंद्र बंद केल्याने पाकिस्तानात 900 मेगावॉट विजेचा तुटवडा निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earthquake hits PoK Death toll rises to 19 over 300 injured