FDA Crime on Golden Bakery
sakal
पुणे - शहरातील प्रसिद्ध गोल्डन बेकरीसह इतर बेकरी, डेअरी व हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुण्यासह विभागातील हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि डेअरी मिळून १० आस्थापनांचे परवाने तातडीने निलंबित केले आहेत. गुरुवारी (ता. १६) आणि शुक्रवारी (ता. १७) करण्यात आलेल्या तपासणीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.