FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

पारोडी येथील दूग्ध प्रक्रिया उद्योगावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून सुमारे सव्वा पाच लाख रूपये किंमतीचे १२ हजार २७८ लिटर भेसळयुक्त दूध केले जप्त.
fda raid on milk business

fda raid on milk business

sakal

Updated on

शिरूर - पारोडी (ता. शिरूर) येथील दूग्ध प्रक्रिया उद्योगावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून सुमारे सव्वा पाच लाख रूपये किंमतीचे १२ हजार २७८ लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले असून जप्त केलेले हे दूध या कारवाईत नष्ट करण्यात आले. जप्त केलेल्या भेसळयुक्त दूधाचे नमूने तपासणीसाठी राज्य मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, या दूध प्रक्रिया उद्योगाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. या धाडसी कारवाईमुळे पांढऱ्या दूधाचा काळा धंदा करणारांचे धाबे दणाणले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com