सावधान : पुण्यात मिळतं कर्नाटकचं भेसळ युक्त पनीर, खवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

पनीर आणि खवा या पदार्थांचे नमुने विश्‍लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या आधारावर या विक्रेत्यांवर पुढील कारवाई केली जाईल.

पुणे : शहरातील अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या 45 व्यावसायिकांकडून 24 लाख 64 हजार रुपयांचे पनीर आणि खवा जप्त करण्यात आला, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पनीर आणि खव्याचे नमुने तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटकातून आलेल्या पनीरची शहरातील विक्री होत असल्याची माहिती पुढे आली. त्या आधारावर 39 अन्नविक्रीच्या ठिकाणांवर छापे टाकून तेथील पनीरचे नमुने संकलित करण्यात आले. या दुकानांमधून 15 लाख 49 हजार 990 रुपये किमतीचे सात हजार 519 किलो पनीर जप्त केले. हे पनीर कमी प्रतीचे असल्याचा संशय आहे. तसेच, राज्याच्या विविध भागांतून विक्रीसाठी आणलेला खवा, शहरातील सहा दुकानांमधून विक्रीसाठी आणलेला चार हजार 574 किलो खवा भेसळीच्या संशयावरून जप्त केला असून, त्याची बाजारातील किंमत 9 लाख 14 हजार 800 रुपये आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संघनेते पी. परमेश्वरन यांचे निधन; मोदी, शहा यांच्यासह अनेकांची श्रद्धांजली

पनीर आणि खवा या पदार्थांचे नमुने विश्‍लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या आधारावर या विक्रेत्यांवर पुढील कारवाई केली जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FDA seizes Adulterated paneer and khoa of karnataka worth Rs 26 lakh 64 thousand in Pune