पुणे : लसींचे लाखो डोस वाया जाण्याची भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine
पुणे : लसींचे लाखो डोस वाया जाण्याची भीती

पुणे : लसींचे लाखो डोस वाया जाण्याची भीती

पुणे : कोरोनाच्या रुग्णांची (corona patient)संख्या कमी झाल्यापासून या विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या लसीकरणाचाही (vaccination)वेग मंदावल्याचे चित्र शहरात दिसते, त्यामुळे शहरातील रुग्णालयांमधून लशीचे लाखो डोस ‘एक्स्पायरी’च्या मार्गावर असल्याची भीती वेगवेगळ्या रुग्णालयांकडून ‘सकाळ’कडे(sakal) व्यक्त करण्यात येत आहे. शहरात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून ओमिक्रॉन(omicron) या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण राज्यात आढळत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांमधील केंद्रांवर जाऊन लस घेणाऱ्यांची संख्या काही अंशी वाढल्याचे निरीक्षण आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदले आहे. मात्र, एकेका केंद्रावर वीस ते पंचवीसपेक्षा जास्त लसीकरण(vaccination) होत नाही. यापूर्वी एकेका केंद्रावर रोज दोनशे जणांना लस दिल्या जात होत्या.

सामाजिक नुकसान

रुग्णालयांना आर्थिक भुर्दंड बसेलच; पण, त्यापेक्षाही लस वाया गेल्याने सामाजिक नुकसान जास्त होईल, अशी भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

खासगी रुग्णालयांना परवानगी

शहरात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य सेवकांपुरतेच हे लसीकरण मर्यादित होते.

शहरातील काही नागरिकांचा अद्यापही लशीचा पहिला डोस घेणे बाकी आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. रुग्णालयांमधील लसीकरण केंद्रावर दररोज नागरिक येऊन लस घेत आहेत, त्यामुळे मुदतीमध्ये ही लस वापरली जाईल.

- मंजूषा कुलकर्णी, सचिव, पुणे हॉस्पिटल असोसिएशन

रुग्णालयांना भेडसावणारे प्रश्न

रुग्णालयांकडे(hospitals) असलेली लशीची मुदत फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान संपत आहे. त्यानंतर ही लस वापरता येणार नाही. त्यामुळे पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये लशीचा साठा कसा संपणार, असा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला पडला आहे. पुण्यातील बहुतांश रुग्णालयांनी ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मध्ये उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड लस खरेदी केली आहे. त्याअंतर्गत किमान सहा हजार डोस रुग्णालयांनी त्या वेळी विकत घेतले. त्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. आता लसीकरणाचा वेग मंदावला आहे, त्यामुळे या लशीचे करायचे काय, हा प्रश्न रुग्णालयांना भेडसावत आहे.

टॅग्स :Pune Newsvaccine