Dnyaneshwar Maharaj palkhi : सासवडच्या पालखी मुक्कामी माउलींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मिष्टान्न भोजन, हरिभजन आणि व्यायामाचा आनंद वारकऱ्यांनी अनुभवला.
सासवड : कीर्तन प्रवचनाची शिदोरी आणि द्वादशीचे पारणे फेडण्यासाठी मिष्टान्न जेवणाचा आस्वाद घेत सासवड येथील पालखी तळावर वारकरी दिवसभर हरिभजनात दंग होते. निमित्त होते, आळंदी येथून पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे.