आत्महत्येपासून युवकाला वाचविणाऱ्या पोलिसांचा सत्कार

संदीप जगदाळे
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

हडपसर - गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणा-या युवकाला तत्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले व त्याचे प्राण वाचविले. याबद्दल युवराज कांबळे व विठ्ठल चिपाडे या पोलिस बांधवांचा पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड व हडपसर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल तांबे यांच्या हस्ते पुस्तक व फुलांचे रोप देवून सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन हडपसर येथील सिद्धेश्वर संस्था व शिवसमर्थ संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते. सिध्देश्र्वर संस्थेचे अध्यक्ष शंतनु जगदाळे व शिवसमर्थ संस्थेच्या अध्यक्षा मनिषा वाघमारे उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Felicitated police who saved the youth from suicide