
पुणे - सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी म्हणून सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले असल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे. पण या महिलेवर अजूनही कारवाई केली नाही. प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचविले जात आहेत.