

Encroachment issue on Fergusson Road in Pune raised in assembly
esakal
शिवाजीनगर: पुणे शहरातील वाढत्या नागरी समस्यांकडे, विशेषतः रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण आणि अनधिकृतपणे सुरू असलेल्या प्री-स्कूल (नर्सरी) शाळांवर सभागृहाचे लक्ष वेधले. नियम २९३ च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी या गंभीर बाबींवर राज्य सरकारने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी केली. पुणे शहराच्या विकासाला अतिक्रमणामुळे गालबोट लागत असून, पुणेकरांमधून यावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.