रोझव्हॅली सोसायटीत खतनिर्मिती प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

नवी सांगवी - पिंपळे सौदागर येथील रोझव्हॅली सोसायटीच्या वतीने ओल्या व सुक्‍या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाची सुरवात करण्यात आली. 

२७६ सदनिका असलेल्या या सोसायटीत रोज एक टन कचरा संकलित केला जातो. त्याचे कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा वीस बाय चार फुटांच्या हौदात एकत्र केला. नगरसेवक नाना काटे, शीतल काटे यांनी सेंद्रिय पदार्थांचे 
विघटन करणारे जिवाणू हौदात टाकून या प्रकल्पाचे उद्‌घाटन केले. या वेळी सचिव रूपेश भंडारे, जयदेव दवे, विवेक महाजन, आनंद कुर्तडीकर, वेंकट शंकर, श्‍वेताभ कुमार यांच्यासह कुणाल आयकॉनचे अध्यक्ष विनोद सुर्वे, पंकज भाकरे उपस्थित होते. 

सोसायटीचे अध्यक्ष कृष्णा पराशर म्हणाले, ‘‘सोसायटीत ओला व सुका कचरा जमा करण्याचे डबे सर्वत्र ठेवले आहेत. सभासदांच्या सहकार्यामुळे कचरा वर्गीकरण करणे सोपे झाले आहे. उद्यानात झाडांचा पडलेला पालापाचोळा, घरातील भाजीपाला व खरकटे या हौदात संकलित करून दर तीन महिन्यांनी खत काढून घेतले जाईल. त्यानंतर ते सोसायटीतील झाडांना व अधिकचे खत विक्रीसाठी उपलब्ध असेल.’’

नगरसेवक काटे म्हणाले, ‘‘कचऱ्यापासून खत निर्मिती हा उपक्रम सर्वच मोठ्या सोसायट्यांनी राबविल्यास कचरा बाहेर येणार नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असल्याचे अशा प्रकल्पाकडे पाहून वाटते. माझ्या प्रभागातील सोसायट्यांसाठी लागणारी मदत व सहकार्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’

Web Title: Fertilizer Generation Project in Rosevally Society