fertilizer
निरगुडसर - खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा खर्चात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात खतांच्या किमती ५० रुपयांपासून ते ४५० रुपयांपर्यंत प्रति ५० किलो पिशवीमागे दरवाढ झाली आहे. आणि पुढील काही दिवसात अजून खतांच्या किंमतीत वाढ होणार असून, ५० किलो पिशवीमागे ५० ते २०० रुपये पर्यंत ही वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे अक्षरश कंबरडे मोडले आहे.