पुणे - ""गडकिल्ले हे राज्याचे वैभव आहे. प्रत्येक किल्ल्याचा इतिहास मोठा आहे. त्याची माहिती आजच्या पिढीसह बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना माहिती व्हावी, यासाठी प्रमुख किल्ल्यांच्या ठिकाणी महोत्सव आयोजित करण्याचा विचार करावा,'' अशा सूचना राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या.

पर्यटन विभागाच्या वतीने राज्यातील दुर्गप्रेमी, गिर्यारोहक, सुरक्षा पुरविणाऱ्या स्वयंसेवी संस्था, गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख प्रतिनिधी, सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी, शिवसेनेचे शहर उपप्रमुख किरण साळी यांच्यासह चाळीस ते पन्नास संस्थांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. त्या बैठकीत ठाकरे यांनी पर्यटन विभागाला या सूचना दिल्या. या वेळी सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज महेश मालुसरे यांनी ठाकरे यांना तानाजी मालुसरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची भेट दिली. या बैठकीत ट्रेकर्स संस्थांनी विविध अडचणी मांडल्या.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
हे गडकिल्ले आपल्यासाठी मंदिरे आहेत, त्यांचे जतन झाले पाहिजे, असे सांगून ठाकरे म्हणाले, ""गडकिल्ल्यांवर येणाऱ्या पर्यटकांच्या अडचणी सोडण्यासाठी एक समिती स्थापन करावी; तसेच गडकिल्ल्यांच्या पायथ्याला आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी पुरातत्त्व खात्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येतील. गावातील ग्रामस्थांना गाइड म्हणून प्रशिक्षण देण्यात यावे. बऱ्याच गडांवर एैतिहासिक प्रसंग घडले आहेत. अशा प्रसंगांची आठवण करून देण्यासाठी त्यांच्या वशंजांना बरोबरच घेऊन महोत्सव घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येईल.''