esakal | भिगवणला कोरोना रुग्नांसाठी दोन दिवसात पन्नास ऑक्सिजन बेड सुविधा
sakal

बोलून बातमी शोधा

Dattatray Bharane

भिगवणला कोरोना रुग्नांसाठी दोन दिवसात पन्नास ऑक्सिजन बेड सुविधा

sakal_logo
By
प्रा. प्रशांत चवरे, भिगवण.

भिगवण - इंदापुर तालुक्यामध्ये वाढती कोरोना रुग्नांची संख्या व कमी पडत असलेली बेडची सुविधा विचारात घेऊन भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटर इमारतीमध्ये पन्नास ऑक्सिजन बेडची व्यवस्था व वैदयकिय आधिकाऱ्याची उपलब्धता दोन दिवसात करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

इंदापुर तालुक्यामध्ये कोरोना रुग्नाचे वाढते प्रमाण विचारात घेऊन येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीमध्ये कोरोना संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. बैठकीसाठी प्रातांधिकारी दादासाहेब कांबळे, प्रभारी तहसलिदार ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, प्रताप पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव गायकवाड,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सचिन बोगावत, सरपंच तानाजी वायसे, भिगवणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने उपस्थित होते.

हेही वाचा: बारामतीत रेमडेसिव्हिरच्या बाटलीत पॅरासिटामॉल भरुन विक्री; चौघांना अटक

दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, इंदापुर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत आठ हजार एकशे शहाऐंशी व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तालुक्यातील १७४ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर सध्या एक हजार तीनशे एकसष्ट सक्रिय कोरोना रुग्न आहे. तालुक्यातील रुग्नांना बेड उपलब्ध व्हावेत, रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा व्हावा तसेच आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी शासनाच्या वतीने लागु करण्यात आलेल्या निर्बंधाचे पालन करावे.

यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे व माजी सरपचं पराग जाधव यांनी कोरोना रग्नांना जाणवत असलेली बेडची, रेमडेसीव्हीर औषधे व ऑक्सिजन बेडची अडचण मांडली व भिगवण येथे ऑक्सजन बेडची तातडीने सुविधा दयावी अशी मागणी केली. बैठकीसाठी आरोग्य विभाग, महसुल विभाग, पोलिस प्रशासन आदी विभागातील आधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याच्या सुचना राज्यमंत्र्यांनी दिल्या.