esakal | बारामतीत रेमडेसिवीरच्या बाटलीत पॅरासिटामॉल भरुन विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

.arrest 4 for Selling  paracetamol in a bottle of Remdesivir in Baramati

बारामती शहरातील फलटण चौकात रेमडेसिव्हिर इंजेक्शन घेण्यासाठी संबंधित युवकाने बोलाविल्यानंतर सापळा लावून तालुका पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

बारामतीत रेमडेसिव्हिरच्या बाटलीत पॅरासिटामॉल भरुन विक्री; चौघांना अटक

sakal_logo
By
- मिलिंद संगई

बारामती : कोरोनावर वरदान ठरलेल्या ‘रेमडेसिव्हीर इंजेक्शन’मध्ये ‘पॅरासिटामॉल’ मिसळून इंजेक्शन म्हणून देणाऱ्या चौघांना बारामती तालुका पोलिसांनी काल रात्री पकडले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी ही माहिती दिली. रेमडेसिव्हीर इंजेक्शन 35 हजाराला विक्री करणाऱ्या दोन युवकांना जेरबंद केली. चौकशीमध्ये ही धक्कादायक माहिती पुढे आली. दिलीप ज्ञानदेव गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती) हा या प्रकाराचा सूत्रधार असून संदीप संजय गायकवाड (रा. भिगवण, ता. इंदापूर) हा बाटल्यांमध्ये पॅरासिटामॉल भरुन त्या पुन्हा सीलबंद करायचे काम करत होता. प्रशांत सिध्देश्वर धरत (रा. भवानीनगर, ता. इंदापूर) व शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती) हे दोघे ही इंजेक्शन्स रुग्णांच्या नातेवाईकांना नेऊन द्यायचे काम करत होते.

Selling  paracetamol in a bottle of Remdesivir in Baramati

Selling paracetamol in a bottle of Remdesivir in Baramati

हेही वाचा: पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग पेपरमधल्या आकृत्याच झाल्या गायब; विद्यार्थ्यांना परीक्षेत अनेक अडचणी

अन्न व औषध प्रशासानेच निरिक्षक विजय नांगरे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील चौघांनाही अटक केली असून त्यांच्याविरुध्द फसवणूकीसह औषधे व सौंदर्य प्रसाधन कायदा 18 क व 27 (1) (2) औषधे किंमत व नियंत्रण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेली फॉर्च्युनर गाडी (क्रमांक एमएच 43- एपी- 9696) ही पोलिसांनी जप्त केली आहे.

हेही वाचा: कोरोना संसर्गाशी संग नको! लक्षणे दिसल्यानंतर उशिरा चाचणी बेतू शकते जिवावर

असा उघड झाला प्रकार....

पोलिसांना एका बातमीदारामार्फत पेन्सिल चौकात दोन युवक रेमडेसिव्हीर इंजेक्शन देण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळाल्यानंतर पोलिस निरिक्षक महेश ढवाण, सहायक पोलिस निरिक्षक योगेश विधाते, पोलिस कर्मचारी राजेंद्र जाधव, रमेश भोसले, दीपक दराडे, निखील जाधव यांच्या पथकाने रात्री साडेबाराच्या सुमारास या दोघांना अटक केली, तेव्हा त्यांच्याकडे इंजेक्शनची फक्त बाटली मिळून आली. त्याचे खोके गायब होते. पोलिसांनी त्यांच्याकडे सखोल तपास केल्यानंतर दवाखान्यात रिकाम्या झालेल्या बाटल्या संदीप गायकवाड गोळा करत असे व त्यात पॅरासिटामॉल भरुन त्या ओरिजनल बाटल्या आहेत असे भासवले जायचे. दिलीप गायकवाड हा हेल्थ इन्शुरन्सचे काम करत असल्याने त्याच्याकडे या इंजेक्शनबाबत नातेवाईक चौकशी करायचे. अशा नातेवाईकांना जादा दराने हे इंजेक्शन देण्याचे काम गायकवाड हा प्रशांत धरत व शंकर भिसे यांच्या मार्फत करत असे.

''अनेक रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांनी अशी इंजेक्शन्स पुरविली असून आता पोलिस त्याचा सखोल तपास करणार असल्याचे नारायण शिरगावकर व महेश ढवाण यांनी सांगितले. या पुढील काळात एजंट किंवा ज्यांच्याकडे औषधविक्रीचा परवाना नाही अशा व्यक्तींकडून औषध स्विकारणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा नारायण शिरगावकर यांनी दिला आहे. अधिकृत औषध दुकाने, वितरक किंवा रुग्णालयांकडूनच औषधे विकत घ्या.'' असे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा: कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा

loading image