हवेली तालुक्यात कोरोनाचा धुमाकळ, चार गावांत पाच दिवसांत पन्नास रुग्ण 

corona
corona
Updated on

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी, कदमवाकवस्ती, फुरसुंगी व लोणी काळभोर या पुर्व हवेलीमधील चार ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. २६) दिवसभरात कोरोनाचे तब्बल चौदा रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये पाच महिला, तर नऊ पुरुष आहेत. 

पूर्व हवेलीत सोमवारपासून (ता. २२) मागिल अवघ्या पाच दिवसांतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल पन्नासवर जाऊन पोचली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या अडीचशेहुन अधिक जणांना आरोग्य विभागाने होम क्वारंटान केले आहे. तर, लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटरमधून शुक्रवारी (ता. २६) सकाळी एकशे पाच जणांचे स्वॅब (घशातील द्रव) तपासणीसाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूर्व हवेलीमधील थेऊर, कुंजीरवाडी, वळती, उरुळी कांचन, कुंजीरवाडी, कदमवाकवस्ती या प्रमुख ग्रामपंयतींच्या हद्दीत मागिल चार दिवसात कोरोनाचे तब्बल 34 रुग्ण आढळून आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या नव्वदहून अधिक जणांचे स्वॅब गुरुवारी (ता. २५) सकाळी तपासणीसाठी पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मिळाला. त्यात फुरसंगी (दोन ), कुंजीरवाडी (दोन), लोणी काळभोर (दोन), मांजरी ब्रुद्रुक (दोन), मांजरी खुर्द (1), असे एकूण नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर, थेऊर फाट्यावरील एका हॉटेलमध्ये येजा करणाऱ्या चार नामांकीत पाहुण्यांसह एक आचाऱी, असे पाच जण पॉझिटिव्ह असल्याचे निस्पन्न झाले. लोणी काळभोर गावातील एक अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्तीही कोरोनाबाधित असल्याचे शुक्रवारी सकाळी उघड झाले, अशी माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी डॉ. डि. जे. जाधव यांनी दिली. 

नागरिक घऱाबाहे्र पडताना तोंडाला मास्क लावत नाहीत. गर्दीत सोशल डिस्टन्स पाळत नाही. त्यामुळे पूर्व हवेलीमधील रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आरोग्य विभागाने मास्कचा वापर न करणाऱ्याना दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com