esakal | Coronavirus : लढू अन्‌ जिंकूही
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Danger

संशयितांची तपासणी करणे
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्कात आलेल्यांची यादी पुणे महापालिकेडून प्राप्त करणे, महापालिकेकडून रुग्णवाहिका प्राप्त करून घेण्यासाठी समन्वय, नायडू आणि वायसीएम रुग्णालयांमधून संबंधित व्यक्तींची तपासणी करून घेण्याबाबत समन्वय : उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के - ९९२२४४८०८० आणि उपजिल्हाधिकारी रेश्‍मा माळी - ९०११०२२६५६. 

परदेशातून आलेल्यांची तपासणी
तारांकित हॉटेलमध्ये केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीबाबत परदेशातून आलेल्या पर्यटकांची तपासणी : उपजिल्हाधिकारी सारंग कोडलकर - ९४०५५०११००. टुर्स अँड ट्रॅव्हल्स यांना दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी : उपजिल्हाधिकारी नीता सावंत-शिंदे - ९४२१११८४४६.

क्वॉरंटाइनसाठी व्यवस्था
इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाइन करण्यासाठी पुरेशी व्यवस्था : उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे - ९०७५७४८३६१; पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत जैविक कचऱ्याची विल्हेवाट : उपजिल्हाधिकारी श्रीमती वैशाली इंदाणी - ९४२२६०७९०७.

Coronavirus : लढू अन्‌ जिंकूही

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अधिकारी सज्ज; जबाबदारी निश्‍चित
पुणे - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्‍चित केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाहने-इमारतींचे अधिग्रहण
जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने आदेश निर्गमित करणे, वाहने-इमारतींचे अधिग्रहण आणि अन्य विभागांशी समन्वय : निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे - ९८२२१०७१२०, श्रीनिवास ढाणे - ८८८८८५८४७४, नागेश गायकवाड - ८१०८७७७५०७.

विलगीकरण कक्षाचे नियमन
विलगीकरण कक्ष स्थापन करून नियमन, विमानतळावर प्रवाशांची यादी यंत्रणेला उपलब्ध करून देणे : उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख - ९८२२१०९९६६, सहायक तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण - ९४२३९५९४९४.

रॅपिड रिस्पॉन्स टीम 
नियंत्रण आराखड्याची अंमलबजावणी, रॅपिड रिस्पॉन्स टीम : उपजिल्हाधिकारी रामदास जगताप - ९४२३००९७७. पुणे महापालिका हद्दीत होम क्वॉरंटाइनबाबत सूचनांची अंमलबजावणी : उपजिल्हाधिकारी सचिन इथापे - ९८८१००२३२१; पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत ‘होम क्वॉरंटाइनबाबत सूचनांची अंमलबजावणी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे - ९४२२०७२५१२.

विमानतळ अधिकाऱ्यांशी समन्वय
विमानतळावरील प्रवाशांच्या तपासणीबाबत विमानतळ अधिकाऱ्यांसमवेत समन्वय, प्रवाशांच्या याद्या विमानतळ अधिकाऱ्यांकडून प्राप्त करून महापालिका आणि सर्व नियंत्रण कक्षांकडे तत्काळ पाठविणे : उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर - ९४२२६१६०३३.

आराखड्याची अंमलबजावणी
पुणे महापालिका हद्दीत कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या संदर्भात नियंत्रण आराखड्याची अंमलबजावणी : उपजिल्हाधिकारी अजय पवार - ९४०३८५३२४८; पिंपरी-चिंचवड हद्दीत कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आराखड्याची अंमलबजावणी : उपजिल्हाधिकारी प्रवीण साळुंखे - ९९७५५३२१७३.

परदेश दौऱ्यांचा अहवाल
उद्योग क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परदेश दौऱ्याबाबतचा अहवाल दररोज नियंत्रण कक्षास सादर करणे : उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल ७०२८४२५२५६, उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख ९५९४६१२४४४. यासोबतच अन्य अधिकाऱ्यांकडे काही जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

तक्रारींबाबत कार्यवाही
नियंत्रण कक्षप्रमुख, तक्रारींबाबत कार्यवाही, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना साहित्य खरेदीसाठी निधी देणे : उपजिल्हाधिकारी सुनील गाढे - ९८२२५३५९६२, सहायक नायब तहसीलदार संतोष सानप - ९९२३५०१२८५.

सर्वेक्षणाची माहिती घेणे
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षणाची माहिती घेऊन नियंत्रण कक्षास कळविणे, घर ते घर सर्व्हे पथकाकडून माहिती घेऊन नियंत्रण कक्षास कळविणे : अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे - ८४१२०७७८९९ आणि उपजिल्हाधिकारी मृणालिनी निंबाळकर - ९९२३२०७७६७.

अत्यावश्‍यक साहित्य पुरवठा  
२४ तास अत्यावश्‍यक साहित्य पुरवठा : जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड - ९६५७७०११८०. खासगी रुग्णालयातील विलगीकरण कक्ष तयारीची माहिती, पुरेशा प्रमाणात खाट आणि साहित्याची उपलब्धता : उपजिल्हाधिकारी आरती भोसले - ९८२२३३२२९८.

प्रयोगशाळा नेटवर्क
प्रयोगशाळा नेटवर्कची माहिती नियंत्रण कक्षास सादर करणे : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक नांदापूरकर - ७५०७२९२१८१.

आयसोलेशन वॉर्डमध्ये सुविधा
आयसोलेशन वॉर्डमध्ये चहापाणी, जेवण, पोलिस बंदोबस्त, रुग्णवाहिका सुविधांची उपलब्धता : जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे - ९८५०७९११११ आणि उपजिल्हाधिकारी सुरेखा माने ७७७५९०५३१५; वाहतूक व्यवस्था उपप्रादेशिक परिवहन अधिकारी : संजीव भोर - ९४२२२२१११४.

कार्यालय समन्वय 
विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय : उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी - ९९७०८१९५९७.

आरोग्य अधिकाऱ्यांशी समन्वय
सरकारी, निमसरकारी आस्थापनेवरील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाबाबत समन्वय अहवाल, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय : उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार - ९५६१२१३३३३.

loading image