पुणे - येरवडा मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांनी त्यांच्या एका सहकाऱ्यास जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. तंबाखूच्या कारणावरून झालेल्या वादातून बराक क्रमांक सहाजवळ हा प्रकार घडला..या प्रकरणी वरिष्ठ तुरुंगाधिकारी रेवणनाथ कानडे (वय ५७) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय शंकर राठोड आणि संतोष सुरेश भालेराव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम पंढरीनाथ पोखरकर असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २७) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम पोखरकर हा स्वच्छतागृहाकडे जात असताना, ‘आमच्याशी तंबाखूच्या कारणावरून वाद का घातला?’ असे म्हणून अजय राठोड आणि संतोष भालेराव या दोघांनी त्याला अडवले. आरोपी अजय राठोड याने लाकडी पट्टीचे मापटे उचलून शुभमच्या डोक्यात मारले. तर संतोष भालेराव याने प्लॅस्टिकची बकेट डोक्यात मारून त्याला जखमी केले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कुंदन सत्रे करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.