ग्रामपंचायत निवडणुका जिंकण्यासाठी लढा - बाळा भेगडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

मावळ पंचायत समितीच्या सभापतिपदी निकिता घोटकुले व उपसभापती दत्तात्रेय शेवाळे यांची निवड झाल्याबद्दल आढले ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भेगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी भेगडे बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा बॅंकचे संचालक बाळासाहेब नेवाळे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, सुवर्णा कुंभार, एकनाथ टिळे, माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे, माजी उपसभापती शांताराम कदम, अलका धानिवले, ज्योती शिंदे उपस्थित होते.

कामशेत - ‘‘कार्यकर्त्यांच्या बळावर मावळात भाजप मोठी आहे. विधानसभेच्या अपयशाची मरगळ झटकून आगामी ग्रामपंचायतींसह सर्व निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसावी,’’ असे आवाहन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मावळ पंचायत समितीच्या सभापतिपदी निकिता घोटकुले व उपसभापती दत्तात्रेय शेवाळे यांची निवड झाल्याबद्दल आढले ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भेगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी भेगडे बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा बॅंकचे संचालक बाळासाहेब नेवाळे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, सुवर्णा कुंभार, एकनाथ टिळे, माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे, माजी उपसभापती शांताराम कदम, अलका धानिवले, ज्योती शिंदे उपस्थित होते. 

घोटकुले यांचा ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सभापती अशा राजकीय प्रवासाचे भेगडे यांनी कौतुक केले. तालुक्‍यात लोणावळा, तळेगाव नगर परिषद, देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड व पंचायत समितीवर भाजपाचे वर्चस्व आहे. तसेच अनेक ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आहेत, याकडे लक्ष वेधून भेगडे यांनी कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठेचा कानमंत्र दिला. घोटकुले यांच्या निष्ठेने त्यांना हे मानाचे पद मिळाले असल्याचे सांगून यापुढे होणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे गणेश भेगडे यांनी सांगितले. युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस बाबूलाल गराडे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन घोटकुले यांनी आभार मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight to win Gram Panchayat elections bala bhegade