
-दोन गटातील वाद पोचला सशस्त्र हाणामारीत सहा जखमी.
- एकमेकांविरुध्दच्या फिर्यादी दाखल
सासवड : येथे प्रसिध्द नेताजी चौक व परिसरात दोन दिवस धुमसत असलेल्या तरुणांच्या दोन गटातील वादाचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले. तू माझ्याकडे का पाहीले.. एवढ्या (कथित) कारणावरुन हा वाद सुरु झाला व दोन्ही गटातील हाणामारीने सहाजण गंभीर जखमी झाले. तर दोन्ही गटांतील मिळून 16 आरोपी या एकमेकांविरुध्दच्या फिर्यादीत आले. जखमी उपचारार्थ रुग्णालयात दाखल असून आरोपींचा शोध सुरु आहे.
- सिरमच्या लसीचा वाद कोर्टात; 'कोव्हिशिल्ड'बाबत कंपनीचे स्पष्टीकरण
सासवड (ता. पुरंदर) या शहरात गेली अनेक दिवस शांतता होती. परंतू गेली अनेक दिवसांत येथे शहरात झालेली व सासवडकरांमध्ये चर्चिली गेलेली ही कोयते व इतर शस्त्रांची मोठी मारामारी आहे. कारण दोन्ही गटांच्या फिर्यादीवरुन व जखमींची स्थिती व संख्या पाहता.. खूनाचा प्रयत्न असाच गुन्हा दाखल झाला आहे. ही तुंबळ हाणामारीची घटना सासवड न्यायालयालगत कऱहा स्वाद हाॅटेलच्या प्रांगणात घडली. एका गटाकडून स्वप्नील दीपक टकले (वय 23, रा. नेताजी चौक, सासवड, ता.पुरंदर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार योगेश टकले, गौरव म्हेत्रे, किरण हे जखमी आहेत. तर संशयित आरोपींमध्ये विनय सुधीर जमदाडे, गौरव पांडुरंग धोत्रे, धनंजय मुन्ना भोंगळे, मल्हार राजेंद्र साळुंखे, परेश सलिल बागवान, अक्षय भोलेनाथ निघोल, अभिषेक प्रमोद गोंधळे, कुणाल तळेकर, स्वप्निल दत्तात्रय ढगारे (सर्व रा. सासवड) यांचा समावेश आहे.
सीरममध्ये भीषण आग; कोविशिल्ड लसीचा प्लांट सुरक्षित आहे का?
दुसऱया गटाकडून मनोज पांडुरंग म्हेत्रे (वय 26, रा. म्हेत्रे आळी,सासवड ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार त्यांच्या गटाचे गौरव पांडुरंग म्हेत्रे, विनय जमदाडे, धनंजय भोंगळे हे गंभीर जखमी आहेत. तर त्यांच्यावर हल्ला करणारे संशयित आरोपींमध्ये.. सोन्या जाधव, योगेश दादा टकले, शुभम बाळासाहेब टकले, स्वप्नील दीपक टकले, प्रवीण मधुकर भोसले, किरण राजेंद्र दीक्षित, संकेत दीपक टकले (सर्व रा. नेताजी चौक सासवड). दोन्ही घटनांनंतर सासवड पोलीस परीसरातील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे व महिला पोलीस उपनिरीक्षक एस. डी. दुरंदे हे तपास करीत आहेत.