
पुणे - मांजरीतील मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कुलाला मान्यता नसतानाही सुरू असून या शाळेवर तत्काळ गुन्हा दाखल करा असे आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी हवेलीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. या शाळेबाबत तक्रारी आल्या होत्या तसेच शाळेची मान्यतेची कागदपत्रे ही बोगस असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.