नारायणगाव : बेकायदेशीर खोदाई प्रकरणी मे. महेश गॅस लिमिटेड कंपनीवर गुन्हा दाखल

नारायणगाव : बेकायदेशीर खोदाई प्रकरणी मे. महेश गॅस लिमिटेड कंपनीवर गुन्हा दाखल
Updated on

नारायणगाव : भूमिगत घरगुती गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी  नारायणगाव शहराअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या रस्त्याची बेकायदेशीर खोदाई करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी खराडी येथील मे. महेश गॅस लिमिटेड कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे साहय्यक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.

या बाबत माहिती अशी की, खराडी येथील मे. महेश गॅस लिमिटेड कंपनीने नारायणगाव शहराला भूमीगत बंद पाईपलाईनव्दारे घरगुती गॅसचा पुरवठा करण्यासाठी १४ सप्टेंबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२०  दरम्यान  नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत बेकायदेशीर खोदाई केली होती. खोदाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या रस्त्याचे नुकसान झाले होते. तसेच काही ठिकाणी  नारायणगाव ग्रामपंचायतीच्या जलनिस्सारण पाईपलाईनच्या खड्ड्यात गॅस पाईपलाईन टाकण्यात आली होती. या बाबतची तक्रार  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे, माहीती अधिकार कार्यकर्ते तानाजी तांबे यांनी १५ सप्टेंबर २०२० रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्नर कार्यालयात केली होती. त्या नुसार  १ हजार ७६९ मीटर लांबीचा रस्ता पुर्ववत करण्यासाठी ४५ लाख २६ हजार ५६३ रुपयांची अनामत व सुरक्षा ठेव रक्कम शासनाकडे जमा करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने मे. महेश गॅस लिमिटेड कंपनीला दिले होते. मात्र या आदेशाची कंपनीने दखल घेतली नाही.

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पाटे यांनी जुन्नर न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन मे. महेश गॅस लिमिटेड कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नारायणगाव पोलिस स्टेशनला दिले होते. पाटे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार २४ डिसेंबर २०२० रोजी नारायणगाव पोलिसांनी मे. महेश गॅस लिमिटेड कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती गुंड यांनी दिली. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com