esakal | धुमधडाक्यात लावले लग्न...पोलिसांनी काढली वरात
sakal

बोलून बातमी शोधा

marriage

जुन्रर तालुक्यातील धालेवाडी व हिवरे बुद्रुक येथील विवाह सोहळ्याचे कार्यमालक आणि लग्नसमारंभ झालेल्या जुन्नर- घोडेगाव रस्त्यावरील मंगल कार्यालयाच्या मालकावर जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

धुमधडाक्यात लावले लग्न...पोलिसांनी काढली वरात

sakal_logo
By
दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्रर तालुक्यातील धालेवाडी व हिवरे बुद्रुक येथील विवाह सोहळ्याचे कार्यमालक आणि लग्नसमारंभ झालेल्या जुन्नर- घोडेगाव रस्त्यावरील मंगल कार्यालयाच्या मालकावर जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर, लग्नानंतर हिवरे बुद्रुक येथे झालेल्या वरातीसाठी बँजो लावल्याबद्दल चालकावर ओतूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा - इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, तिघांना अटक 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना आपत्ती व्यवस्थापन कायद्याची पायमल्ली करत मोठ्या थाटामाटात विवाह साजरा करण्यात आला होता. दरम्यान विवाहासाठी आलेला पाव्हणा कोरोनाबाधित असल्याने कोरोनाचा प्रसार झाला. वधू- वरांसह दोन्ही बाजूकडील सुमारे पंचवीसपेक्षा अधिक वऱ्हाडी मंडळी कोरोनाबाधित झाली, तर शंभरहून अधिक जणांनी आपले स्वॅब तपासून घेत कोरोनाची खात्री करून घेतली. पोलिसांनी या सोहळ्यास ५० जणांसाठी परवानगी दिली होती. मात्र, येथे मोठ्या संख्येने वऱ्हाडी उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातील मंडळी शुभाशीर्वाद देण्यासाठी आली होती. लग्नानंतर हिवरे बुद्रुक येथे नवरदेवाच्या घरासमोर रात्री वरातीचा कार्यक्रमही बेंजो लावून धूमधडाक्यात साजरा करण्यात आला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असून, तसे झाले नाही तर पोलिस प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशारा पोलिस निरीक्षक युवराज मोहिते यांनी दिला आहे.
 
Edited by : Nilesh Shende

loading image