Breaking: दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक

पांडुरंग सरोदे
रविवार, 12 जुलै 2020

दोघाच्या फोन कॉलमध्ये काही संशयित फोन टॅप करण्यात आले असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली होती. त्यामुळे त्यांचा  इसिसची संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणेला आला. या कारवाईसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने विश्रांतवाडी पोलिसांची मदत घेतली.

पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पथकाने महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या मदतीने रविवारी पुण्यातुन दोघाना अटक केली. संबंधीत कारवाई ही इस्लामिक स्टेट्स (आयस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरुन झाली असण्याची शक्यता आहे. या कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली. बेकायदा हालचाली प्रतिबंधात्मक कायद्यानुसार (युएपीए) ही कारवाई करण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सादिया अन्वर शेख (वय 21, रा. येरवडा) व नाबील सिद्धिक खत्री (वय 27,रा. कोंढवा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दिल्ली येथील "एनआयए"चे पथक रविवारी पुण्यात आले होते.दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी आणि विश्रांतवाड़ी पोलिसांची "एनआयए"ने मदतीला घेतले होते. त्यांच्या मदतीने पथकाने येरवडा येथून एका महिलेला तर कोंढवा येथून एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले.

आणखी वाचा - पुण्यात सहाव्या लॉकडाउनची घोषणा, वाचा सविस्तर बातमी

दोघाच्या फोन कॉलमध्ये काही संशयित फोन टॅप करण्यात आले असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली होती. त्यामुळे त्यांचा  इसिसची संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणेला आला. या कारवाईसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने विश्रांतवाडी पोलिसांची मदत घेतली. दोघाकडे प्राथमिक चौकशी सुरू आहे. याप्रकरणी स्टेशन डायरीत नोंद करण्यात आली आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक ही संघटना दक्षिण आशिया आणि मध्यवर्ती आशिया याठिकाणी कार्यरत आहे. या संघटनेने एका बॉम्बस्फोट प्रकरणी जबाबदारी स्वीकारली होती. त्यानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, दोघांचीही तपास यंत्रणेकडून कसून चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Edited by Raviraj Gaikwad


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three arrested connection with terrorist organisation islamic state including woman