टेमघरच्या गळतीची शेवटच्या टप्पातील उपाय योजना फेब्रुवारीत सुरू

The final phase of the Temghar leakage plan starts in February
The final phase of the Temghar leakage plan starts in February

खडकवासला(पुणे) : टेमघर धरणाच्या गळती प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा शेवटचा टप्पा यंदा फेब्रुवारीत सुरू होणार आहे. त्यासाठी टेमघर धरण रिकामे करण्यात येत असून धरणात आज ३८.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यानंतर धरणाच्या मजबुतीकरणाचा टप्पा पुढील वर्षी सुरू करण्याचे नियोजन असल्याचे पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले.

शहराला पिण्याचे पाणी मिळावे म्हणून टेमघर धरणाची निर्मिती झाली. यातून मुळशी हवेलीतील एक हजार हेक्टर क्षेत्रफळ सिंचनाखाली आले. धरणाचे काम २००० मध्ये सुरू झाले. पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यासाठी २०१०-११ पर्यत वाट पहावी लागली.या धरणाची क्षमता ३.७१ टीएमसी आहे. धरण बांधणीसाठी २५२ कोटी रुपये खर्च आला होता. दरम्यान, २०१७ मध्ये धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आले. तेव्हापासून या धरणाच्या गळतीच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम राज्य सरकारकडून सुरू आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

गळती रोखण्यासाठी केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन संस्थेच्या (सीडब्ल्यू अॅण्ड पीआरएस) तज्ज्ञ समितीकडून कामाची पाहणी करीत आहे. मागील वर्षी पर्यंत झालेल्या कामामुळे धरणाची गळती ९० टक्के थांबली आहे. 

पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले की, 'सुधारित प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊन दुरुस्तीची कामे  फेब्रुवारी मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. गळतीची अखेरच्या टप्प्यातील दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी धरणातील पाणीसाठा कमी करण्याची दीड- दोन महिन्यापासून सुरू आहे. सध्या टेमघर धरणातून दररोज ३०० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. पाच बंधाऱ्यातून उरलेले पाणी  खडकवासला धरणात जमा होते.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या धरणाच्या दुरुस्तीचे काम २०१७ पासून सुरू आहे. कोरोनाच्या काळात दुरुस्तीची कामे थांबली होती. उर्वरित मजबुतीकरणाची दीर्घ कालावधीची कामे करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे. त्या संदर्भात राज्य पातळीवरील तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठका झाल्या आहेत. त्यानुसार समितीकडून याबाबतचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे आला आहे. महामंडळाकडून हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे, असे ही कोल्हे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com