Scholarship
sakal
पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत एप्रिलमध्ये घेतलेल्या इयत्ता चौथी आणि सातवीच्या परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या सोमवारी जाहीर झाला आहे. राज्यातील इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्तीसाठी एक लाख ७६ हजार ५८६ विद्यार्थी पात्र ठरले असून त्यातील १६ हजार ६९३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत. तर, इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्तीसाठी एक लाख १८ हजार ९६० विद्यार्थी पात्र ठरले असून त्यापैकी १६ हजार ५८८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत.