अखेर कात्रज-स्वारगेट बीआरटीमार्गावर धावली बस; पाहा व्हिडिओ

Finally the Katraj-Swargate BRT route bus stated in Pune
Finally the Katraj-Swargate BRT route bus stated in Pune

कात्रज (ता. ०५) : सातारा रस्त्यावरील बीआरटी अखेर आज (ता. ०५) शुक्रवारी चालू झाली. बीआरटी मार्गातून पीएमपीएल बस आणि रुग्णवाहिकाखेरिज दुसरी वाहतूक दिसत नव्हती. काही ठिकाणी दुचाकीस्वार बीआरटी मार्गातून खासगी वाहनांनी प्रवास करु नये यासाठी सुरक्षारक्षक ठेवल्याचेही चित्र पहायला मिळाले. त्यांत्यासोबत वाहतूक पोलिसही आहेत. त्याचबरोबर बीआरटी मार्गातून प्रवाशांची चढऊतार होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी पीएमपीच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. 

बीआरटी बसथांब्यात सूचनाफलक लावलेले आहेत. पहिलाच दिवस असल्याने प्रवाशांचा गोंधळ होऊ नये यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक बीआरटी बसथांब्यावर दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. कात्रज-स्वारगेट मार्गावर चालू झालेल्या बीआरटीला प्रवाशाकडूंनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असून वेळ वाचत असल्याने प्रवाशी खूश आहेत. कात्रज स्वारगेट मार्गावरून तासाला साधारणतः २० ते २५ बसेस जात आहेत. दरम्यान, शहरात २००५-०६मध्ये हडपसर-स्वारगेट-कात्रज मार्गावर बीआरटी कार्यन्वित झाली होती. 

पहिलाच दिवस असल्याने काही लक्षात येत नाही. गोंधळ उडत आहे. परंतु, नेहमीपेक्षा कमी वेळात आणि सुखकर प्रवास होत असल्याने आनंद मिळत असल्याचे प्रवासी सीताराम चव्हाण यांनी सांगितले. तर, वाहन चालकांना सूचना देण्यासाठी पीएमपीने अधिकाऱ्यांची नेमणूक केल्याने जास्त अडचणींना सामोरे जावे लागत नसून नेहमी प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हे अत्यंत सुखकर असल्याचे प्रवासी राजाराम वीर यांनी म्हटले.

बीआरटीचा प्रवास म्हणजे महिलांसाठी सुखकारक असून सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्वाचा आहे. काही दिवासांपूर्वी चोरीच्या बसमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या, अशा घटनाही होण्याची शक्यता कमी वाटत असल्याचे महिला प्रवासी अनिता भालके यांनी सांगितले. चढण्या-उतरण्याचा त्रास कमी झाला आहे. वेळ वाचत आहे. सुरुवातीला गोंधळाची स्थिती निर्माण झाली असली तरी प्रवास सुखकारक वाटत असल्याचे महिला प्रवासी सुनिता नवनाथ निंबोरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com