esakal | पुण्याचे दोन नेते महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी
sakal

बोलून बातमी शोधा

Two Pune leaders as vice presidents of Maharashtra Congress


काँग्रेसने महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर केली असून प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय सहा कार्याध्यक्ष निवडण्यात आले आहेत.

पुण्याचे दोन नेते महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे :  विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे सोपण्यात आली आहेत.राजीनाम्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडू असं म्हटलं होतं. 

काँग्रेसने महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर केली असून प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय सहा कार्याध्यक्ष निवडण्यात आले आहेत. यामध्ये शिवाजीराव मोगे, बसवराज पाटील, मोहम्मद आरीफ नसीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे आणि प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे.


काँग्रेसनं दहा महाराष्ट्र उपाध्यक्षांची नेमणूक केली असून. यामध्ये पुण्याच्या दोन नेत्यांचा समावेश आहे. आमदार रमेश बागवे, मोहन जोशी यांच्या नावांचा समावेश आहे.  

loading image