सिंहगड रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी मशीन अखेर आले; सकाळच्या पाठपुराव्याला यश

निलेश बोरुडे
Monday, 26 October 2020

'हायब्रीड 'अॅन्युईटी' या अंतर्गत सिंहगड रस्त्याचे काम तब्बल दोन वर्षांपासून सुरू आहे.  'सकाळ'चा पाठपुरावा आणि विविध संघटनांची आंदोलने झाल्यानंतर ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू केले होते; मात्र इस्टिमेट प्रमाणे काम न करता ठेकेदार निकृष्ट काम करत असल्याचे दिसून आल्यानंतर 'सकाळ'मधून वृत्त प्रसारित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला रस्त्याचे काम करण्यासाठी आवश्यक असलेले मशीन आणण्यास सांगण्यात आले असल्याचे त्यावेळी सांगितले होते.

किरकटवाडी (पुणे) : सिंहगड रस्त्याच्या नांदेड फाटा ते डोणजे फाटा दरम्यान सुरू असलेल्या कामासाठी 'स्लीप फॉर्म पेव्हर' मशीनचा वापर करून कॉंक्रिटीकरण करणे आवश्यक असताना ठेकेदाराकडून मशीन न वापरता मजुरांकडून निकृष्ट दर्जाचे काम करून घेतले जात असल्याबाबत 11 ऑक्टोबरला 'सकाळ'मधून वृत्त प्रसारित झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर बातमीची दखल घेऊन ठेकेदारास मशीन आणण्यास भाग पाडले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

'हायब्रीड 'अॅन्युईटी' या अंतर्गत सिंहगड रस्त्याचे काम तब्बल दोन वर्षांपासून सुरू आहे.  'सकाळ'चा पाठपुरावा आणि विविध संघटनांची आंदोलने झाल्यानंतर ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू केले होते; मात्र इस्टिमेट प्रमाणे काम न करता ठेकेदार निकृष्ट काम करत असल्याचे दिसून आल्यानंतर 'सकाळ'मधून वृत्त प्रसारित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला रस्त्याचे काम करण्यासाठी आवश्यक असलेले मशीन आणण्यास सांगण्यात आले असल्याचे त्यावेळी सांगितले होते. त्यानुसार केंद्रीय जल अकादमी जवळ रस्ता कॉंक्रिटीकरणाचे मशीन दाखल झाले असून आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात केव्हा होते याकडे खड्डे व अरुंद रस्त्याने हैराण झालेल्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.

निकृष्ट रस्ता पून्हा करून घेतला जाणार.....
ठेकेदाराने अगोदर काम केलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत. तसेच काही ठिकाणी रस्ता खचला आहे. मशीनचा वापर न करता काम केल्याने रस्ता खाली-वर झालेला आहे. अशाप्रकारे निकृष्ट काम झालेल्या ठिकाणी ठेकेदाराकडून रस्त्याचे काम पून्हा करून घेतले जाणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाप्पा बहिर यांच्याकडून सांगण्यात आले.

तब्बल पावणे अकरा लाखाच्या मेफेड्राॅनसह 16 लाखाचा मुद्देमाल जप्त; दोघाना अटक

"रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी आवश्यक असलेले मशीन आले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने काम सुरू करण्यात अडचणी येत आहेत. ठेकेदाराने 'रेडी मिक्स काँक्रिट' चा प्लांटही उभारला आहे. आता यस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर वेगात पूर्ण होईल."
- ज्ञानेश्वर राठोड, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
 

दोरीच्या साहाय्याने तिसऱ्या मजल्यावर उतरत शिक्षिकेने केली चिमुरडीची सुटका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally the machine came for cement concreting of Sinhagad road