esakal | आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवदाम्पत्यांना आर्थिक साहाय्य
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage

आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवदाम्पत्यांना आर्थिक साहाय्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - सामाजिक न्याय विभागाकडून गेल्या वर्षभरात आंतरजातीय विवाह (Intercaste Marriage) करणाऱ्या साडेसहाशेहून अधिक नवदाम्पत्यांना (Newlyweds) तीन कोटी २८ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य (Economic Help) देण्यात आले आहे. त्यातून आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या संसाराला उभारी मिळाली आहे. (Financial Assistance to Newlyweds Intercaste Marriage)

जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक साहाय्य योजना राबविण्यात येते. पुणे विभागात २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील ६५४ विवाहित जोडप्यांना ३ कोटी २८ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या संयुक्त नावाने ५० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात येतो.

हेही वाचा: पुणे : म्युकरमायकोसिस रुग्णसंख्या जुलैमध्ये निम्म्याहून कमी

जोडप्यांना वितरित केलेली रक्कम (लाखात)

जिल्हा जोडपी रक्कम

पुणे १८८ ९४

सातारा १४० ७०

सांगली १२० ६०

सोलापूर १०० ५०

कोल्हापूर १०८ ५४

योजनेचा लाभ घेण्यासाठी पती-पत्नी हे महाराष्ट्रातील रहिवासी असावेत. जातीचा दाखला आणि आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याबाबतचा अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे उपलब्ध असून, त्यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

- बाळासाहेब सोळंकी, प्रादेशिक उपायुक्त, जिल्हा समाज कल्याण विभाग

loading image