आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटूंबास आर्थिक मदत

दत्ता म्हसकर
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

जुन्नर : तांबे (ता. जुन्नर) येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून तान्हाजी सीताराम मिंढे या शेतकऱ्याने 31 ऑगस्टला आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेनंतर घरातील कर्ता पुरुष गमावल्याने मिंढे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा तान्हाजी मिंढे यांचा परिवार. या कुटुंबाला आर्थिक हातभार देण्याच्या उद्देशाने सकल मराठा समाज, जुन्नर शिवनेरीच्या वतीने 1 लाख 18 हजार 800 रुपयांचा मदतनिधी गोळा करण्यात आला.

जुन्नरचे तहसिलदार किरणकुमार काकडे यांच्या हस्ते तान्हाजी मिंढे यांच्या पत्नी कविता मिंढे यांजकडे सुपूर्त करण्यात आला. याबाबतची माहिती अशी की, शेतात उत्पादित केलेल्या शेतमालाला दोन वर्षे समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने भांडवलही सुटत नव्हते. त्यामुळे भांडवलासाठी 
हात उसने घेतलेले पैसे कसे परत करायचे या नैराश्यातून तान्हाजी मिंढे याने आत्महत्या केली. ही घटना घडल्यानंतर सकल मराठा समाज जुन्नर शिवनेरीच्या वतीने दत्ता म्हसकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजबांधवाना मदतीचे आवाहन केले.

या आवाहनाला प्रतिसाद देत समाज बांधवांनी तब्बल 1 लाख 18 हजार 800 रुपयांची आर्थिक मदत जमा केली. नारायणगाव येथून सरपंच योगेश ऊर्फ बाबू पाटे, संजय वाजगे, सुजित खैरे यांनी भरीव मदत केली. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील ढोबळे यांनी व समाजबांधवांनी कविता मिंढे यांचे भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडून त्या खात्यात ही रक्कम जमा केली. पोस्टाचे पासबुक तहसीलदार किरणकुमार काकडे यांच्या हस्ते कविता मिंढे यांजकडे सुपूर्त करण्यात आले. काकडे यांनी सकल मराठा समाजाच्या या उपक्रमाचे कौतुक करत शासन पातळीवर मदतीची तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी दत्ता म्हसकर, सुनील ढोबळे, मिननाथ पानसरे, भास्कर पानसरे, संजय खंडागळे, मंडलाधिकारी रोहिदास सुपे आदी उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: financial help to family of farmer who commit suicide