
Pune University
Sakal
पुणे - ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २०१७ ते २०२४ या काळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार याचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करण्याची मागणी लावून धरत अधिसभेत सदस्यांनी विद्यापीठातील आर्थिक गैरव्यवहारासह आर्थिक अनियमिततेचे वाभाडे काढले. अखेर, या आर्थिक गैरव्यवहाराचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करण्यात येईल. त्याचा अहवाल ३१ मार्च २०२६ पर्यंत समोर येईल, असा निर्णय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी अधिसभेत जाहीर केला.