पुणे विद्यापीठाच्या पतपेढीत आर्थिक घोळ? चौकशी होत नसल्याने संचालकाचा राजीनामा

SPPU
SPPU

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक सहकारी पतपेढीमध्ये आर्थिक अनियमितता झाली आहे, ऑडिटमध्ये ताशेरे ओढूनही याची  चौकशी केली जात नाही, असा आरोप करत पतपेढीचे संचालक संतोष मदने यांनी राजीनामा दिला असल्याने संस्थेतील कामकाज संशयाच्या भोवर्यात सापडला आहे.  पुणे विद्यापीठात सुमारे ३० वर्षापासून सेवकांची पतपेढी आहे. वर्षाला ६ कोटी पेक्षा जास्त रकमेची उलाढाल होते. पतपेढीतून कर्ज उचललेल्या कर्मचाऱ्यांनी हप्ते भरले आहेत. पण त्याच्या नोंदी दुसऱ्यांच्या खात्यावर दाखवल्या जात आहेत. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना कर्ज नील झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे, पण त्यांच्या खात्यावर अजूनही थकबाकी दर्शवली जात आहे.

पतपेढीत जवळपास ४० संशयास्पद खाते आहेत. त्यामध्ये आर्थिक अनियमितता दिसून येत आहे. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी पतपेढीचे पदसिद्ध अध्यक्ष कुलसचिव डॉ. प्रफुल पवार यांच्यासह सर्वांकडे करण्यात आली. मात्र  तक्रारींची दखल घेतली नाही.

हेही वाचा - पुणेकरांनो सवलतींचा गैरवापर नको; लॉकडाऊनमध्ये विनाकारण हिंडणाऱ्यांवर कारवाई
संतोष मदने म्हणाले, " विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कष्टाच्या पैशावर ही पतपेढी उभा केली आहे. त्यात गैरव्यवहार होवूनही चौकशी केली जात नाही. या प्रकरणात न्याय मिळत नाही म्हणून मी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे." पतपेढीचे अध्यक्ष प्रफुल्ल पवार म्हणाले, "मदने यांनी पतपेढीमध्ये आर्थिक अनियमितता असल्याची तक्रार केलेली असून,  त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. यासंदर्भात पतपेढी कडून खुलासा मागविण्यात आलेला आहे." पतपेढीचे सचिव हनमंत खांदवे पाटील म्हणाले, "पतपेढीतील व्यवहाराबद्दल कुलसचिवांनी खुलासा मागविला असून तो सादर केला जाईल."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com