
आर्थिक नियोजन म्हणजे केवळ संपत्तीत वाढ घडवून आणण्यापुरती मर्यादीत बाब नव्हे; तर स्थिरता, आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य या वैशिष्टांनी भरलेले एक सर्वांगसुंदर जीवन साकारण्याची एक महत्वपुर्ण कृती म्हणजेच आर्थिक नियोजन होय. तुम्ही करिअरची सुरवात करत असाल, कौटुंबिक जीवन साकारात असाल किंवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असाल तर अतिशय योग्य असे आर्थिक नियोजन हे जीवनातील अनिश्चिततेला सहज तोंड देताना जीवनातील विविध ध्येय गाठण्यास तुम्हाला निश्चित मदत करते.