
ओतूर - उदापूर (ता. जुन्नर) येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून प्रकाश (पप्पू) दत्तात्रेय सस्ते (वय ३३, रा. उदापूर, ता. जुन्नर) या शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता.२५) दुपारी साडे तीन वाजे दरम्यान उघडकीस आली. त्याने घराजवळच्या चिक्कूच्या झाडाला दोरीच्या मदतीने गळफास घेतला.