पतीला मुलाला भेटण्यास मज्जाव केला तर प्रत्येक चुकलेल्या भेटीसाठी पाच हजार रुपये दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Court-Family

पतीला मुलाला भेटण्यास मज्जाव केला तर प्रत्येक चुकलेल्या भेटीसाठी पाच हजार रुपये दंड

पुणे : कौटुंबिक वादामुळे विभक्त राहणाऱ्या वडिलांना मुलाच्या भेटीपासून रोखणाऱ्या पत्नीला कौटुंबिक न्यायालयाने खडसावले आहे. पतीला मुलाला भेटू दिले नाही तर चुकलेल्या प्रत्येक भेटीसाठी पत्नीला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असा आदेश कौटुंबिक न्यायालयाने न्यायाधीश निरंजन नाईकवाडे यांनी दिला आहे.

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले तर मुलाचा ताबा वडिलांकडे सोपविण्यात येईल, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे. सोहम आणि रेखा (दोघांची नावे बदलेली आहेत) यांचे मे २००७ मध्ये लग्न झाले होते. सोहम एका खासगी कंपनीत अभियंता आहे. रेखा यांचे अभियांत्रिकी शिक्षण झाले असून गृहिणी आहेत. लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांच्यात मतभेद होवू लागते. त्यातून त्यांच्यात सातत्याने वाद होत होत. त्यामुळे सोहम हे विभक्त राहू लागले. त्यांनी २०२१ मध्ये अ‍ॅड. तौसिफ शेख, अ‍ॅड. स्वप्नील गिरमे आणि अ‍ॅड. दीपक गायकवाड यांच्यामार्फत घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे.

घटस्फोटाचा दावा दाखल करताना मुलाचा ताबा मिळावा यासाठी देखील त्यांनी अर्ज दाखल केला होता. दावा सुरू असताना पत्नी हेतुपुरस्सर मुलाला त्यांच्या वडिलांना भेटू देत नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. त्यामुळे न्यायालयाने पतीला मुलाला भेटण्याची परवानगी दिली आहे. तसेच जर पत्नीने मुलाला भेटू दिले नाही, तर चुकलेल्या प्रत्येक भेटीसाठी तीला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. तसेच पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत मुलाला भेटू दिले नाही, तसेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले तर मुलाचा ताबा वडिलांकडे सोपविण्यात येईल, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Fine Each Missed Visit Husband Refuse Meet Child Family Court Order Wife

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..