प्रेमाचं नाटक करुन फसवलं; गर्लफ्रेन्ड आणि बाळाला सोडून बॉयफ्रेन्डने काढला पळ

जनार्दन दांडगे
Saturday, 17 October 2020

''बुलढाणा जिल्ह्यातील एका खेडेगावात राहणारी १९ वर्षीय अनिता (नाव बदलले आहे) ही तरूणी लोणी काळभोर परिसरातील एका नातेवाईकाकडे राहण्यास 11 महिन्यांपूर्वी आली होती. अनिताचे नातेवाईक कामानिमित्त दिवसभर बाहेर असल्याने, अनिताची ओळख स्वप्निल क्षीरसागर यांच्याशी झाली. ओळखीचे रुपांतर थोड्याच दिवसात प्रेमात झाले.

लोणी काळभोर (पुणे) : लग्नाचे अमिष दाखवून एकोणीस वर्षीय तरुणीची फसवणूक केल्याप्रकरणी उस्मानाबाद जिल्हातील एका २४ वर्षीय तरुणाच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. संबधित तरुणाने फिर्यादी तरुणीसह वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. त्यांनतर या संबधातून त्यांना मुलगा होताच, फिर्यादी तरुणीला व तिच्या बाळाला सोडून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

स्वप्निल किसन क्षीरसागर (रा. आपसिंग, ता तुळजापुर, जि उस्मानाबाद) हे त्या गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असुन, फसवणूकीचा वरील प्रकार मागील दहा महिन्याच्या कालावधीत घडला आहे. दरम्यान स्वप्निल क्षीरसागर याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असल्याची माहिती लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली आहे.         

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ''बुलढाणा जिल्ह्यातील एका खेडेगावात राहणारी १९ वर्षीय अनिता (नाव बदलले आहे) ही तरूणी लोणी काळभोर परिसरातील एका नातेवाईकाकडे राहण्यास 11 महिन्यांपूर्वी आली होती. अनिताचे नातेवाईक कामानिमित्त दिवसभर बाहेर असल्याने, अनिताची ओळख स्वप्निल क्षीरसागर यांच्याशी झाली. ओळखीचे रुपांतर थोड्याच दिवसात प्रेमात झाले. दरम्यान स्वप्निलने आपण एका कंपनीत नोकरीला असून, अनिताला आपण लवकरच लग्न करणार असल्याचे स्वप्न दाखविण्यास सुरुवात केली. याच दरम्यान दोघांचे अनेकवेळा शारीरिक संबंध आले. 

महाराष्ट्राच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान अनिताला गरोदर असल्याची जाणीव फेब्रुवारी महिन्यात झाली. यावर ही बाब अनिताने स्वप्निलसह तिच्या नातेवाईकांही सांगितली. यावर स्वप्निलने ''पुढील 1-2 महिन्यात लग्न करु,'' असे सांगून वेळ मारुन नेली. याच दरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले. लॉकडाऊन काळात लग्नासाठी गावाहून पैसे आणण्यासाठी गेलेला स्वप्निल परत आलाच नाही. या दरम्यान मागील 6 महिन्यांच्या काळात वेळोवेळी अनिता व तिच्या नातेवाईकांनी फोनवरुन स्वप्निलशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्याने फोन उचलला नाही. याच दरम्यान दहा दिवसांपूर्वी अनिताने एका मुलाला जन्म दिला आहे. 
                

''स्वप्निल फोन घेत नाही अथवा लग्न करण्यासाठी वेळोवेळी बोलावूनही येत नसल्याचे अनिताच्या लक्षात आल्याने, अखेर दोन दिवसांपूर्वी अनिताने पोलिसात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरज बंडगर करीत आहेत.

दहा हजार कोरोनामुक्त; आठवडाभरातील आकडेवारीने पुणेकरांना दिलासा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR Filed against Boy who ran away leaving his baby and girlfriend In Pune