esakal | अखेर मनोहरमामा यांच्याविरुद्ध बारामतीत गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर मनोहरमामा यांच्याविरुद्ध बारामतीत गुन्हा दाखल

अखेर मनोहरमामा यांच्याविरुद्ध बारामतीत गुन्हा दाखल

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे : सकाळ वृत्तसेवा

माळेगाव :  बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करीत दोन लाख ५१ हजार रुपये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीच्या गळ्यातील थायराईड- कॅन्सर बरा करतो, असे सांगून तिघांनी संगणमत करीत रुग्णाच्या कुटुंबियांना फसवणूक केली. मागील तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता.

याप्रकरणी शशिकांत सुभाष खरात ( वय 23, व्यवसाय मोबाइल दुरुस्ती दुकान,  रा. साठेनगर, कसबा बारामती) यांनी तिघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आज पोलिसांनी निर्णायक भूमिका घेत मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जिल्हा सोलापूर) , विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा, ओमकार शिंदे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

हेही वाचा: पुण्यात निर्बंधांवर कोणी बोलत नाही, इथे लगेच ओरडतात - किशोरी पेडणेकर

महाराष्ट्र नरबळी कायद्यासह इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादूटोणा, औषध चमत्कारी उपाय करणे, फसवणूक करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आदी कलमाच्या आधारे पोलिसांनी वरील संशयित आरोपी मनोहर मामा व त्याच्या साथीदारांविरुद्ध कारवाई केली. दरम्यान, शशिकांत खरात यांनी फिर्यादीमध्ये वरील आरोपींविरुद्ध गंभीर तक्रार केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

हेही वाचा: पुण्यात निर्बंधांवर कोणी बोलत नाही, इथे लगेच ओरडतात - किशोरी पेडणेकर

मागील तीन वर्षापासून मनोहर भोसले याने मी बाळूमामा यांचा अवतार असल्याचे भासविले. ''तुझ्या वडिलांचा गळ्यातील थायराईड- कॅन्सर बरा करतो'' असे त्याने सांगितले. तसेच बाभळीचा पाला, साखर, भंडारा माझ्या आजारी वडीलांना खाण्यास दिला व विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा, ओमकार शिंदे (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यासोबत संगणमत करून मनोहरमामा याने वेळोवेळी दोन लाख 51 हजार पाचशे रुपये घेतले. हे पैसे न दिल्यास माझ्या वडिलांना जीविताची भीती त्यांनी घातली. तसेच हे पैसे परत मागितल्यास मला जीवे मारण्याची धमकी दिली,`` अशी तक्रार खरात यांनी फिर्य़ादिमध्ये नमूद केली आहे. पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल घुगे वरिल प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. संबंधित आरोपींना अद्याप अटक झाली नसून लवकरच संबंधित आरोपींना पकडून सदर प्रकरणातील तपासाची दिशा स्पष्ट केली जाईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

loading image
go to top