पुणे - कोंढवा परिसरातील जागेवर ताबा मिळविण्यासाठी दोन गटांमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही जागा ताब्यात घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र अग्रवाल यांनी एका गटातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना लेखी अधिकारपत्र दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावरून कोंढवा पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.