संचारबंदीत जादा दराने गॅस सिलिंडर विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरात संचारबंदी लागू आहे. असे असताना बोपोडी येथील भाउ पाटील रस्ता येथील छाजेड़ पेट्रोल पंपाजवलील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पसमोरील रस्त्यावर एका एजन्सीचे दोन टेम्पो सिलिंडर भरुन थांबले होते. त्यातील कामगार बेकायदेशीररित्या सिलिंडरची मुळ किंमत 790 रुपये असताना प्रत्यक्षात एक सिलिंडर 1200 रूपयांना ग्राहकांना विकत होते.

पुणे : संचारबंदीचा गैरफायदा घेत एका गॅस एजन्सीच्या कामगारांकडुन बेकायदेशीररित्या घरगुती गॅस सिलिंडर मुळ किंमतीपेक्षा जादा दराने ग्राहकाना गॅस सिलिंडरची विक्री केली जात असल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी बोपोडी येथे उघडकीस आला. याप्रकरणी दोन कामगारांसह गॅस एजन्सीच्या मालक-चालकाविरुद्ध खडकी पोलिस ठान्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कामगार नरेंद्र रघुविरसिंग ठाकुर (वय 31, रा. शिवाजी पुतला, दापोडी), विजय जीवन मुदलीयार (वय 46, रा. शंकर काची चाळ, दापोडी), मालक श्रीकांत विश्वासराव पाटील (वय 51, रा. बोपोडी गावठाण), चालक ऋषिकेश श्रीधर भोपटकर (वय 47, रा. औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तु कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अमोल भोसले यांनी फिर्याद दिली आहे.

coronavirus: स्वस्त आणि ताजी भाजी थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरात संचारबंदी लागू आहे. असे असताना बोपोडी येथील भाउ पाटील रस्ता येथील छाजेड़ पेट्रोल पंपाजवलील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पसमोरील रस्त्यावर एका एजन्सीचे दोन टेम्पो सिलिंडर भरुन थांबले होते. त्यातील कामगार बेकायदेशीररित्या सिलिंडरची मुळ किंमत 790 रुपये असताना प्रत्यक्षात एक सिलिंडर 1200 रूपयांना ग्राहकांना विकत होते. पोलिसानी दोन्ही कामगारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन 46 सिलिंडर, दोन टेम्पो असा एक लाखाचा ऐवज जप्त केला. त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर ठाकुर व मुदलीयार या दोन्ही कामगारानी एजन्सीचे मालक श्रीकांत पाटील व चालक ऋषिकेश भोपटकर यांच्या सांगन्यावरुन हा प्रकार केल्याची कबूली दिली. त्यानंतर अन्न पुरवठा अधिकारी यांच्या उपस्थिततीत चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR lodged against illegal sales of gas cylinders