
Sushrut Ghaisas Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी प्रवेश नाकारल्यानं गर्भवती महिलेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी डॉ. सुश्रुत घैसास यांनी प्राथमिकदृष्ट्या चूक केल्याचं स्पष्ट झालं आहे. पण या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य शासनानं नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल हा आजच शासनाला प्राप्त होणार आहे. हा अहवाल आल्यानंतर लगेचच डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील सूचक विधान भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केलं आहे.