कुरकुंभ एमआयडीसीत आग लागल्याची व स्फोट झाल्याची अफवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीत आग लागल्याची व स्फोट झाल्याची अफवा असून त्यावरती कोणीही विश्वास ठेऊ नये असे आवाहन दौंडचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीत आग लागल्याची व स्फोट झाल्याची अफवा असून त्यावरती कोणीही विश्वास ठेऊ नये असे आवाहन दौंडचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज सकाळी अकरा वाजल्यापासूनच कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहत कंपनीत आग लागल्याची व स्फोट झाला असून या घटनेमुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे अशी अफवा पसरली. या अफवेमुळे स्थानिकांना बाहेर गावातील नातेवाईक व मिञमंडळीचे सतत माहिती घेण्यासाठी व खुशाली विचारण्यासाठी फोन येत आहेत.

शिवेंद्रराजेंच्या फेसबुकपेजवरील पवारांचा उल्लेख बदलला

सतत येणार्या फोन ग्रामस्थ ञस्त झाले आहेत. यासंदर्भात पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कंपनी आग किंवा स्फोट झाल्याची अफवा आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. अशा अफवांवर कोणी विश्वास ठेऊ नये. ही अफवा कोणी पसरवली त्याचा शोध चालू असल्याची माहिती महाडिक यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire and explosion have occurred in kurkumbh MIDC is Rumor