Godown Fire : देखाव्याच्या सामानाच्या गोदामास आग; सात ते आठ लाखाचे नुकसान

हिंगण्‍यातील खोराड वस्ती भागातील देखाव्याच्या सामानाच्या गोदामास सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली. यामध्ये देखाव्याचे सामान जळून खाक झाले.
Godown Fire
Godown Firesakal
Updated on

सिंहगड रस्ता - हिंगण्‍यातील खोराड वस्ती भागातील देखाव्याच्या सामानाच्या गोदामास सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली. यामध्ये देखाव्याचे सामान जळून खाक झाले. सुमारे सात ते आठ लाखाचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. आनंदनगर अग्निशमन केंद्र आणि नवले अग्निशमन केंद्राच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे सात बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. सिंहगड रस्ता भागातील या आठवड्यातील आगीची ही चौथी घटना आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com