esakal | पुणे जिल्ह्यात 420 रुग्णालयांचे फायर ऑडिट
sakal

बोलून बातमी शोधा

fire audit

पुणे जिल्ह्यात 420 रुग्णालयांचे फायर ऑडिट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात आगीची दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून फायर ऑडिट करण्यात येत आहे. आत्तापर्यंत ४२० रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित ३०२ रुग्णालयांचे ऑडिटही येत्या आठवड्यात पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये आढळून आलेल्या त्रुटींची १५ दिवसांत पूर्तता करून घेण्याचे संबंधित रुग्णालयांना आदेश दिले आहेत.

विरारमधील कोविड रुग्णालयात आगीच्या दुर्घटनेत जीवित हानी झाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णालयांचे फायर ऑडिट सुरू केले आहे. त्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास महामंडळाचे (पीएमआरडीए) आयुक्त सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. जिल्ह्यातील ७२२ रुग्णालयांपैकी पुणे शहरातील १८५, पिंपरी-चिंचवडमधील ४० आणि ग्रामीण भागातील १९५ अशा ४२० रुग्णालयांचे ऑडिट पूर्ण झाले आहे. उर्वरित ३०२ रुग्णालयांचे ऑडिटचे काम करण्यात येत आहे.

हेही वाचा: कोरोनाचा कहर अन् त्यातही आळंदीत ग्रामिण रूग्णालयात पार्किंगमध्ये चिकन पार्टी

पुणे शहरातील १९१ रुग्णालयांपैकी १८५ रुग्णालयांचे ऑडिट पूर्ण झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १३३ रुग्णालयांपैकी ४० रुग्णालयांचे ऑडिट पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागातील ३९८ रुग्णालयांचे ऑडिट करण्यात येणार आहे. त्यापैकी १९५ रुग्णालयांचे ऑडिट झाले आहे. रुग्णालयांचे ऑडिट करताना काही ठिकाणी त्रुटी आढळल्या आहेत. त्या त्रुटी सात ते १५ दिवसांत दुरुस्त करून घ्याव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत.’’

- सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे

हेही वाचा: जिद्दीला सलाम! भावासोबत चहा-पोहे विकून पाहतोय IAS होण्याचं स्वप्न

फायर ऑडिटमधील त्रुटी

- सदोष वातानुकुलित यंत्रणा आणि विद्युत उपकरणे

- आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव

- संकटसमयी बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग नसणे

- आगीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा

- फायर एक्स्टिंगविशर, आग प्रतिबंधक उपकरणांचा अभाव, पाण्याची उपलब्धता

loading image
go to top